विकिस्पीशीज् बद्दल
- Wikispecies बद्दल वाचा Wikipedia वर
विकिस्पीशीज् मागची प्रेरणा
नवीन प्रजातींचे वर्गीकरण करणाऱ्या जीवशास्त्रज्ञांचे शोध विशेष नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असल्यामुळे, कुठल्या एखाद्या प्रजातीची औपचारिक नोंद एक पेक्षा अधिक वेळा वेगवेगळ्या नियातकालिकांमध्ये प्रकाशित झाली असल्यास या समस्येकडे अनेकदा विशेषज्ञांचे देखील लक्ष जात नाही.
याच कारणामुळे आत्तापर्यंत ज्ञात असलेल्या सर्व प्रजातींच्या गणनेची एकूण संख्या अचूक आहे असे म्हणता येत नाही. "ज्ञात असलेल्या सर्व प्रजाती" याचा अर्थ "पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सगळ्या प्रजाती" असा नसून केवळ "वैज्ञानिक प्रकाशनांमधून वर्णित झालेल्या एकूण प्रजाती" असा होय.
एकूण किती प्रजाती अस्तित्वात आहेत याची माहिती कोणालाच नाही. उदाहरणार्थ, 'क' विशेषज्ञांप्रमाणे 'गांडूळ' कुळातल्या १७००० प्रजाती माहितीत असतील तर विशेषज्ञ 'ख' यांच्या समजुतीप्रमाणे याच कुळातल्या प्रजातींची संख्या २०००० असेल. प्रजातींच्या आकडेवारीबद्दल एकमत नसण्याची दोन मुख्य कारणे आहेत: १. प्रजातींची नोंद करण्यासाठी केंद्रीकृत प्रक्रिया अस्तित्वात नसणं आणि २. कुठल्याही विशिष्ट प्रजातीवरील ज्ञानाच्या सद्यस्थितीबद्दलची माहिती जिथे ब्राऊज् करता येईल असा माहितीकोष किंवा संदर्भ निर्देशिका उपलब्ध नसणं.
दृष्टीपथ
विकिस्पीशीज् ने प्रजातींच्या वर्गीकरणावरचा "एक केंद्रित, विस्तीर्ण माहितीकोष" व्हावं: वैज्ञानिकांसाठी आणि इतर सगळ्यांसाठी एक मुक्त, विस्तीर्ण माहितीकोष जो आपल्या ग्रहावरील जैविक विविधता प्रतिबिंबित करेल. कारण जीवन हेच मुळी सार्वजनिक अधिक्षेत्र आहे!
साधारण हाच हेतू साध्य करण्याचं प्रयोजन असलेल्या विज्ञान शाखेकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या मोठ्या प्रकल्पांची संख्या वाढत आहे. उदा. Catalogue of Life, EoL, इत्यादी. यांपैकी बहुतेक प्रकल्पांच्या बाबतीतली मुख्य अडचण ही की त्यांत त्रुटी आढळल्यास त्या सुधारण्याचा वाचकांना वाव नसतो, आणि त्यामुळे त्या जशाच्या तशाच राहून जातात.
सहकार्य करण्याची संधी
आपणांस विकिस्पीशीज् साठी मजकूर स्वरूपात योगदान करायचे असल्यास, हे कसे करावे आणि विकिस्पीशीज् वर डेटा जोडणे किती सोपे आहे याच्या माहिती आणि स्पष्टीकरणासाठी आमचे Help:Contents हे सदर पहा.
विकिस्पीशीज् शी निगडीत आमच्या धोरणांविषयी आपल्याला काही प्रश्न पडले आहेत का? उत्तरे जाणून घेण्यासाठी Wikispecies:Charter पहा.